Ad will apear here
Next
रत्नागिरीमध्ये कर्करोग शिबिरात महिलांची तपासणी


रत्नागिरी : फिनोलेक्स इंडस्ट्रीजने त्यांचे सीएसआर पार्टनर असलेल्या मुकुल माधव फाउंडेशन यांच्या सहयोगाने येथील परकार हॉस्पिटल येथील फिनोलेक्स वूमन्स वेलबीइंग क्लिनिकमध्ये मॅमोग्राफी व कॉल्पोस्कोपी तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये एक ते १३ ऑक्टोबर या कालावधीत ३३७ महिलांची तपासणी करण्यात आली.

महिलांच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्याचा संकल्प कंपनीने केला आहे. या शिबिराला प्रथमच रायगडमधील स्वदेश फाउंडेशनचा प्रतिसाद मिळाला. या संस्थेची स्थापना रॉनी व झरीना स्क्रूवाला यांनी रायगडच्या ग्रामीण भागाच्या सक्षमीकरणासाठी केली. ग्रामीण महिलांच्या आरोग्याविषयी स्वदेश फाउंडेशन करीत असलेले कार्य पाहून मुकुल माधव फाउंडेशनने कर्करोगविषयक तपासण्या अत्यंत माफक दरात करायचे ठरवले. रायगडमधील २७ महिलांच्या जाण्या-येण्याच्या सुमारे ४५० किमी प्रवासाची व भोजनाची सोय कंपनीने केली. या व्यवस्थेबद्दल महिलांनी समाधान व्यक्त केले. महिलांचे आरोग्य जपण्याच्या मुकुल माधव फाउंडेशनच्या प्रयत्नांबद्दल त्यांनी विशेष आभार मानले.

बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय आहे. प्राथमिक स्तरावरच निदान होणे अवघड असते. समाजामध्ये जागरूकता नसल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होते. यासाठी मॅमोग्रॅफी मशिन उपलब्ध करून देण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीजने पुढाकार घेतला. २०१४पासून परकार हॉस्पिटलमध्ये फिनोलेक्स वुमन्स वेलबीइंग क्लिनिक सुरू झाले.



मॅमोग्राफीमध्ये अत्यल्प क्ष-किरणांचा वापर करून स्तनांच्या कर्करोगाचे निदान आणि तपासणी केली जाते. वेळेत निदान झाल्यामुळे त्याचे निवारण करण्यासही मदत होते. कॉल्पोस्कोपीद्वारे गर्भाशय, योनीमार्गाची तपासणी केली जाते. तपासणीनंतर पुण्यातील प्रशांती कॅन्सर केअर मिशनचे संस्थापक डॉ. कोप्पीकर यांनी या उपक्रमामध्ये आवश्यक उपचार आणि शस्त्रक्रियेची सोयही उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या संचालिका आणि मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका रितू छाब्रिया म्हणाल्या, ‘एक स्त्री प्रत्येक कुटुंबाचा आधारस्तंभ आहे आणि त्यामुळे तिचे आरोग्य हे अतिशय महत्त्वाचे आहे. आजकाल चाळीशीनंतर मॅमोग्राफी व कॉल्पोस्कोपी या तपासणीबरोबरच संपूर्ण आरोग्य तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. २०१४मध्ये या केंद्राची स्थापना केली आणि दिवसेंदिवस याबाबत सर्वांपर्यंत माहिती पोहचते आहे. महिला स्ततःहून येतील, त्याहूनही त्यांचे कुटुंबिय त्यांना, त्यांच्या उद्याच्या सुरक्षित आणि आरोग्यदायी आयुष्यासाठी इथे आणून या चाचण्या करून घेतील.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZIABT
Similar Posts
रत्नागिरीत रोबोटिक्स कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद रत्नागिरी : तालुक्यातील गोळप येथील मुकुल माधव विद्यालयामध्ये १६ जुलैला रोबोट बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. रोबोटेक्स इंडिया आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
‘फिनोलेक्स’ आणि ‘मुकुल माधव’तर्फे सेरेब्रल पाल्सीग्रस्तांची तपासणी पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सेरेब्रल पाल्सी आजाराने त्रस्त मुलामुलींसाठी राबविण्यात येत असलेल्या अभियानांतर्गत २६६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. सेरेब्रल पाल्सीग्रस्तांसाठी रत्नागिरी आणि सातारा येथे दोन दिवसीय सर्वंकष मूल्यांकन आणि तपासणी शिबिर घेण्यात आले
कर्करोग निदानासाठीच्या तपासण्यांचे रत्नागिरीत शिबिर रत्नागिरी : स्त्रियांच्या स्तनांच्या व गर्भाशयाच्या कर्करोग निदानासाठी आवश्यक असलेल्या मॅमोग्राफी आणि कॉल्पोस्कोपी तपासणीच्या ‘संकल्प २०१८’ या शिबिराला रत्नागिरीत एक ऑक्टोबर २०१८पासून सुरुवात झाली. फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल-माधव फाउंडेशन आणि परकार हॉस्पिटलतर्फे हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, शिबिराचे यंदा दहावे वर्ष आहे
डेरवण येथे ‘वुमन्स वेल बिइंग’ शिबिराचे आयोजन चिपळूण : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशन आणि वालावलकर हॉस्पिटल यांच्या सहयोगाने ‘वुमन्स वेल बिइंग’ शिबिराचे आयोजन एक ते १५ मार्च २०१९ या कालावधीत (सोमवार वगळून) करण्यात आले आहे. हे शिबिर दररोज सकाळी नऊ ते दुपारी ४.३० या वेळेत डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात होईल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language